S M L

एकतर्फी प्रेमातून ठाण्यातल्या तरुणीवर जीवघेणा हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: May 27, 2015 12:19 PM IST

एकतर्फी प्रेमातून ठाण्यातल्या तरुणीवर जीवघेणा हल्ला

27  मे : ठाण्यातील इथल्या घोडबंदर रोडवरच्या सिनेवंडर मॉलच्या पार्किंगमध्ये सुजीत धावते या तरुणाने एक 23 वर्षांच्या तरुणीवर एक तर्फी प्रेमातून चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घडली. पीडित तरुणीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, सुजीतला कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीप धावते आणि पीडित तरुणी एकाचं दुकानात काम करत होते. सुदीपने पीडित तरूणीला दुसर्‍या मुलाच्या बाइकवर बसताना पाहिलं आणि या गोष्टीचा त्याला राग अनावर झाला. मंगळवारी संध्याकाळी सुजीतने तरुणीला याविषयी जाब विचारायला मॉलच्या पार्किंगमध्ये भेटायला बोलवलं. तिथे त्यांच्या भांडण झालं आणि रागाच्या भारत सुजीतने तिच्यावर चाकुहल्ला केला. या प्रकारानंतर मॉलमधल्या इतर नागरिकांनी पळून जाणार्‍या 25 वर्षींय आरोपी सुदीप धावतेला पकडून कापुरबावडी पोलिसांच्या हवाले केलं. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मॉल परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close