S M L

कोकणात भात खरेदीसाठी नितेश राणेंचं ठिय्या आंदोलन

Sachin Salve | Updated On: May 27, 2015 06:13 PM IST

कोकणात भात खरेदीसाठी नितेश राणेंचं ठिय्या आंदोलन

nitesh rane thiya andolan27 मे : कोकणात सरकारने भात खरेदी अजून सुरू केलेली नाही, असा आरोप करत आज (मंगळवारी) काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आंदोलन केलं. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार कमी पडतंय, असा आरोपही राणे यांनी केला.

कोकणातल्या गोदामांमध्ये अजूनही गेल्यावर्षीचा भात आहे. त्यामुळे यावर्षी अजून खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. हा मुद्दा आता नितेश राणेंनी उचलला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी)पदयात्रा काढून गोदामांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवलं. त्याशिवाय मुंबई-गोवा हायवेवर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं.

मे महिना संपत आला तरी सरकारनं अजून भाताची खरेदी केली नाही, याबाबत सरकारनं साधी चर्चाही केली नाही, असा आरोप राणेंनी केलाय. आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे भातखरेदीबाबत कलेक्टरांना भेटले खरे, पण त्यांनी कलेक्टरांसोबर फक्त फोटोसेशन केलं, अशी टीकाही नितेश राणेंनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close