S M L

गुन्हा दाखल झाल्यानंतर सनी लिओन पोलीस आयुक्तालयात हजर

Sachin Salve | Updated On: May 27, 2015 06:40 PM IST

गुन्हा दाखल झाल्यानंतर सनी लिओन पोलीस आयुक्तालयात हजर

27 मे : अभिनेत्री सनी लिओनच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आपला जबाब नोंवदण्यासाठी सनी लिओनने ठाणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. पोलिसांनी तिचा जबाव नोंदवून घेतलाय.

सनी लिओनच्या विरोधात डोंबिवली मधील रामनगर पोलीस ठाण्यात अश्लीलता मोहिमेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणी शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. रणरागिणी शाखेच्या अंजली पालन यांनी सदरचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी जवाब नोंदविण्यासाठी सनी लियोन आज ठाणे पोलिस आयुक्तालयात आपल्या वकील आणि नातेवाईकासोबत आली होती . पोलिस उपयुक्त गुन्हे याच्या कडे तिने आपला जवाब नोंदविला. सनी लिओनने आपल्या संकेत स्थळाद्वारे अश्लीलतेचा प्रसार केल्या प्रकरणी सदरचा गुन्हा दाखल केला होता. या संकेतस्थळावरून तिची नग्न छायाचित्र आणि व्हिडिओ असल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर तिचे म्हणणे आणि जवाब घेण्यासाठी आज सनी लिओन ठाणे पोलीस आयुक्तालयात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close