S M L

जैतापूर विरोधात शिवसेना मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार

Sachin Salve | Updated On: May 28, 2015 03:20 PM IST

जैतापूर विरोधात शिवसेना मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार

28 मे : जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना मच्छीमारांच्या मोर्चात उतरणार आहे. जैतापूर प्रकल्पाविरोधात उद्या मच्छीमार सागरी मोर्चा काढणार आहेत.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोटीतून प्रकल्पस्थळाजवळ निदर्शने करणार आहेत. मात्र असं असलं तरी जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेना नेत्यांमध्ये संभ्रम असल्याच दिसतंय. प्रकल्पाला विरोध हा केवळ सुरक्षेच्या कारणास्तवर असल्याचं खासदार अनंत गिते यांनी रत्नागिरीत वक्तव्य केलं होतं. वर्षपूर्तीनिमित्त सेना-भाजप मेळाव्यात गीते यांनी हे वक्तव्य केलंय. यापूर्वी प्रकल्पाला विरोध नसल्याचं रामदास कदम यांनी विधान केलं होतं. या वक्तव्यावरुन शिवेसेनेची जैतापूरबाबतची भूमिका बदलती का ? असा प्रश्न निर्माण झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2015 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close