S M L

काळबादेवी प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा -धनंजय मुंडे

Sachin Salve | Updated On: May 28, 2015 06:21 PM IST

काळबादेवी प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा -धनंजय मुंडे

28 मे : काळबादेवी अग्निप्रलयात मुंबई फायर ब्रिगेडच्या चार अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. या आगीला जबाबदार असलेल्यांविरोधात अजून गुन्हा नोंदवला नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या पोलिसांच्या दिरंगाईबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी इतका वेळ का लागतोय याचा खुलासा गृह खात्याची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केलीये. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसंच मालमत्ता कराच्या वाढीतून 17 लाख मुंबईकरांना सूट देण्याचा निर्णय आघाडी सरकारने पाच वर्षांसाठी घेतला होता. त्याची मुदत 31 एप्रिल 2015 ला संपली. त्यामुळं आधीचाच निर्णय भाजप सरकारने कॅरी फॉरवर्ड किंवा कॉपी पेस्ट केलाय अशी टीकाही धनंजय मुंडेंनी केली.

खरीप हंगामाच्या वेळी शेतकर्‍यांनी 272 कोटी रुपयांचा प्रिमियम भरला. पण राज्य सरकारनं अर्थसंकल्पात एक पैशाची तरतूद केली. आता कुठे आकस्मिकता निधीत पिक विम्यासाठी 700 कोटी रुपयांची तरतूद केलीये. अजूनही जर पिकं विम्याचे पैसे शेतकर्‍यांना तातडीने दिलेले गेले नाही, तर शेतकर्‍यांसाठी आंदोलन उभे करू असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2015 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close