S M L

जैतापूरविरोधी मोर्चाकडे सेनेच्या आमदारांनी फिरवली पाठ

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 01:22 PM IST

sena on jaitapur4429 मे : एकीकडे शिवसेनेनं जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम दर्शवलाय. तर दुसरीकडे मवाळ भूमिका घेत आहे. आज (शुक्रवारी) जैतापूरमध्ये निघणार्‍या मच्छीमारांच्या सागरी मोर्चाकडे शिवसेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली आहे. आजच्या मच्छिमारांच्या मोर्चाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. पण मोर्चात मात्र सेनेचे स्थानिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा जैतापूर विरोध थंडावला आहे का अशी चर्चा आता सुरू आहे.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी , उदय सामंत , सदानंद चव्हाण आंदोलनाला उपस्थित राहणार नाहीत. साखरी नाटे, तुळसुंदे, सागवे या परिसरातील सर्व मच्छीमार आज सागरी मोर्चा काढणार आहे. प्रकल्पस्थळाजवळ समुद्रात निदर्शने करणार आहेत. त्यामुळे आज परिसरात मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जैतापूरला विरोध दर्शवला होता. पण, पंतप्रधानांनी विकासाकामात आड येऊ नका असा सल्ला दिला होता. त्यानंतर सेनेच्या नेत्यांचा सूर मावळलाय. सेनेचे नेते जैतापूर प्रकल्पाला विरोध नाही पण स्थानिकांची गळचेपी होऊ नये असं भूमिका मांडत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close