S M L

गवळीच्या पॅरोलमध्ये पुन्हा वाढ, 12 जूनपर्यंत जेलबाहेरच

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 04:04 PM IST

गवळीच्या पॅरोलमध्ये पुन्हा वाढ, 12 जूनपर्यंत जेलबाहेरच

29 मे : गँगस्टर अरुण गवळी याला पुन्हा सलग दुसर्‍यांदा पॅरोल वाढवून मिळालाय. नागपूर हायकोर्टाने अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 12 जूनपर्यंत वाढ केलीय. आईच्या आजारपणासाठी त्याला हा पॅरोल वाढवून मिळालाय.

गवळीच्या 80 वर्षांच्या आईच्या गुडघ्यावर येत्या 10 तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे. याच कारणासाठी गवळीला ही सुट्टी वाढवून मिळालीय. गेल्या 5 मे रोजी नागपूर जेलमधून गवळी मुलाच्या लग्नासाठी जेलबाहेर आला होता. तेव्हापासून तो जेलबाहेरच आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close