S M L

मुंबई गोवा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, 5 वर्षांत 2 हजार 973 बळी

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 06:57 PM IST

मुंबई गोवा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, 5 वर्षांत 2 हजार 973 बळी

29 मे : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलंय. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गेल्या पाच वर्षांत या मार्गावर झालेल्या 2 हजार 973 अपघातांमध्ये 685 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 हजार 543 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरचं काम हाती घेण्यात आलं. सुरूवातीला जलदगतीने होणार्‍या कामाची गती पुढे कमी झाली. आणि आता हे काम पूर्णपणे ठप्प झालंय.

मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प झालं आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. वाहनांच्या पर्यायाने अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गरजेचं झालं होतं. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी यासाठी सातत्याने आंदोलनं केली. त्यानंतर या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरचे काम हाती घेण्यात आलं . सुरूवातीला जलदगतीने होणार्‍या कामाची गती पुढे कमी झाली आता हे काम पूर्णपणे ठप्प झालं आहे.

मुंबई - गोवा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनलाय. गेल्या पाच वर्षात या मार्गावर झालेल्या 2 हजार 973 अपघातांमध्ये 685 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 543 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यानंतर त्याची भयानकता समोर येते.

2010 मध्ये 675 अपघात 182 जणांचा मृत्यू 682 प्रवाशी गंभीर जखमी

2011 मध्ये 611 अपघातांची नोंद यामध्ये 136 जणांचा बळी , तर 435 प्रवाशी जखमी

2012 मध्ये 619 अपघातात 124 जणांचा मृत्यू , तर 433 प्रवाशी गंभीर जखमी

2013 मध्ये 487 अपघातात 122 प्रवाशांचा मृत्यू , 339 जण गंभीर जखमी

2014 मध्ये 457 अपघातांची नोंद, यात 93 जणांचा बळी गेला तर 327 प्रवाशी गंभीर जखमी झाले

2015 मध्ये एप्रिल अखेर ार्यंत 124 महामार्गावर अघातांची नोंद झाली, यात 28 जण दगावले तर 327 जण जखमी 

2 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या कामाची पाहणी केली. त्यावेळी हे काम जलदगतीने सुरू करावे अन्यथा काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला होता. परंतु त्यांच्या इशार्‍याला ठेकेदाराने दाद दिल्याचे दिसत नाही. कामात कुठेही गती आल्याचं दिसत नाही.

पत्रकारांच्या आंदोलनामुळे हे काम सुरू झालं असल तरी ते वेळेत पूर्ण होत नाही. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय .

शासनाच्या या नाकर्तेपणा विरोधात पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 06:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close