S M L

निर्व्यसनी लोकांनाच एसटीत नोकरी, रावतेंची घोषणा

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 09:44 PM IST

निर्व्यसनी लोकांनाच एसटीत नोकरी, रावतेंची घोषणा

divakar ravte329 मे : तंबाखूजन्य पदार्थांमुळे एसटी महामंडळांच्या बसेसची अवस्था कचराकुंडीसारखीच झालीय. त्यामुळे यापुढे एस टी महामंडळात कुठलीही भरती करताना निर्व्यसनी लोकांनाच संधी देणार असल्यांचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलं.

यासाठी संबंधित कर्मचार्‍यांकडून बॉन्ड लिहून घेता येईल का ?, यासारख्या कायदेशीर बाबींचाही विचार राज्य सरकार करेल असंही रावते यांनी सांगितलंय.

जागतिक तंबाखु विरोधी दिनाच्या निमित्तानं बेस्ट परिवहनाच्या 25 बसेस मुंबईच्या प्रवाशांना तंबाखुच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणार आहेत. या बसेसचे उद्धाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आलं.

तंबाखुसेवनामुळे होणार्‍या जनजागृतीसाठी सलाम बाँम्बे आणि बेस्ट परिवहनच्या वतीनं या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

एस टी महामंडळाच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकता येणार नाहीत असा निर्णय सरकारनं घेतलाय मात्र केवळ कायदा करून प्रश्न सुटणार नाही असं रावते यांनी यावेळी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close