S M L

राज्यातील 12 टोलनाके 1 जूनपासून बंद

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 09:58 PM IST

toll kolhapur29 मे : राज्यातील 12 टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि 53 टोलनाक्यांवर लहान वाहनांना आणि एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमाफ करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्याची अंमलबजावणी आता 1 जूनपासून होणार आहे. आज (शुक्रवारी) याबाबत टोलबंदीसाठी सरकारनं अधिसूचना जारी केलीये. त्यामुळे काही टोलनाक्यांवरची बंदी, आणि काही टोलनाक्यांवर अंशत: टोलबंदी लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरीत 19 प्रकल्पावरील 26 टोल नाके, राज्य रस्ते विकास महामंडळाडील 12 प्रकल्पावरील 26 पथकर नाके, अशा 53 टोल नाक्यावर कार, जीप आणि एसटीला 31 मेच्या मध्यरात्री टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 10 एप्रिलला विधानसभेत हा निर्णय सरकारनं जाहीर केला होता. तर सार्वजनिक बांधकाम खात्याकडील 38 टोल नाक्यापैकी 11, तर MSRTC च्या एक म्हणजे एकूण 12 टोल नाके पुर्णता बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सरकारनं काढलेल्या अधिसूचनेमुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच मार्ग मोकळा झालाय. दरम्यान, टोलमाफी लागू झाली नाही. तर टोल बंद पाडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय.

टोलमुक्ती की धूळफेक?

- राज्यातले 12 टोलनाके कायमचे बंद होणार

- राज्यातल्या 53 टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेसना टोलमधून सूट

- 1 जूनपासून सुरू होणार अंमलबजावणी

- मुंबईचे 5 टोलनाके आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत आताच निर्णय नाही

- अप्पर मुख्य सचिवांची समिती 31 जुलैपर्यंत निर्णय घेणार

- कोल्हापूरमधल्या टोलबाबत 31 मेपर्यंत निर्णय

- या 53 टोलनाक्यांमध्ये पीडब्ल्यूडीचे 27 तर एमएसआरडीसीचे 26 टोलनाके आहेत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close