S M L

पालिकेच्या व्यवहारात सोपी मराठी वापरा-आयुक्त

Sachin Salve | Updated On: May 30, 2015 06:27 PM IST

पालिकेच्या व्यवहारात सोपी मराठी वापरा-आयुक्त

palika aukt330 मे : एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेनं मराठी भाषेसाठी सोपी पद्धत वापरण्यासाठी पाऊल उचलले आहे. पालिकेच्या दैनदिन व्यवहारात सोपी मराठी भाषा वापरावी असा आग्रह पालिकेचे नवे आयुक्त अजय मेहता यांनी केलाय.

मुंबई महानगर पालिकेचे नवे आयुक्त अजय मेहता यांनी प्रशासनातल्या सर्व मुख्य अधिकार्‍यांना एक परिपत्रक काढलंय. त्यानुसार पालिकेतल्या व्यवहारी मराठीतले क्लिष्ट शब्द शोधून त्याला पर्यायी शब्द शोधले जावे, मराठीला सोपं केलं जावं यासाठी अधिकार्‍यांना 15 तारखेची मुदत देण्यात आलीय.

शिवाय त्यानंतर तीन महिन्याच्या आत या सोप्या भाषेचा वापर सुरू केला जावा, असं या परिपत्रकात म्हटलय. पालिकेतल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी मात्र या परिपत्रकाला विरोध केला असून मराठीच्या कुठल्याही शब्दांना वगळू देणार नाही असं नगरसेवकांचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2015 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close