S M L

महामार्ग की मृत्यूचे सापळे ?, दरवर्षी 1 लाख 36 हजार बळी

Sachin Salve | Updated On: May 30, 2015 08:21 PM IST

महामार्ग की मृत्यूचे सापळे ?, दरवर्षी 1 लाख 36 हजार बळी

30 मे : नागपूरमधल्या पाच डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा एका महामार्गांवरचा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आपल्या देशात दरवर्षी जवळपास एक लाख 36 हजार जण रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात...का होतात हे अपघात,याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..

रस्ते..महामार्ग..देशाच्या विकासामधल्या मुलभूत गरजा..पण गेल्या काही वर्षांत हे महामार्ग मृत्यूचे सापळे बनलेत. गेल्या 15 दिवसातले अपघात..

18 मे - मुंबई-आग्रा महामार्गावर एसयूव्ही आणि टेम्पो अपघात 5 डॉक्टरांचा मृत्यू

22 मे - मुंबई गोवा महामार्गावर मिनी बसला झालेल्या अपघातात 2 ठार , 22 जखमी

25 मे - आंध्रमधल्या कर्नूल महामार्गावर अपघातात 7 बारामतीकर ठार

25 मे - मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ टेंपो आणि लक्झरी बसमध्ये अपघात 11 ठार

30 मे - पंचमढीजवळ कार आणि ट्रक अपघात 5 डॉक्टरांचा मृत्यू

एकट्या मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये 85 जणांचा मृत्यू झालाय. तर मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 983 अपघातांची नोंद झाली. 2013 सालच्या केंद्राच्याच अहवालानुसार देशभरातले 13.8 टक्के अपघात केवळ महाराष्ट्रात घडतात.

अपघात का होतात?

- रस्त्यांची खराब अवस्था

- गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसणे

- धोक्याच्या ठिकाणी दुभाजक नसणे

- अती वेगामुळे गाडीवरचा ताबा सुटणे

- दारू पिऊन गाडी चालवणे

- इंडिकेटर न लावता लेन बदलणे

- समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे

- घाटामध्ये धोकादायक वळणांवर ओव्हरटेक करणे

- पार्किंग लाईट्स न लावता महामार्गांवर थांबणे

फक्त महामार्ग बांधणं नाही, पण ते सुरक्षित कसे राहतील, यावरही सरकारनं भर द्यायला हवा. जुन्या महामार्गांची डागडुजीही तेवढीच महत्त्वाची. सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं, की प्रवास हा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी करावा..रेस लावण्यासाठी किंवा इगो कुरवाळण्यासाठी नव्हे.. सरकार असो वा समाज, या अपघातांची गंभीर नोंद घ्यायला हवी.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2015 08:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close