S M L

१०० कोटींच्या खालचे टोल बंद करावे-राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: May 31, 2015 09:31 PM IST

raj_nashik435३१ मे : उद्या १ जूनपासून राज्यातील १२ टोल कायमचे बंद होणार आहे. राज्यसरकारने याबाबतअध्यादेश काढलाय. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असमाधानी व्यक्त केलीये. १०० कोटींच्या खालचे टोल बंद करण्यात यावे आणि टोलवसुलीत पारदर्शकता असावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये होत असलेलेल्या सिंहस्थ कुंभ मेळाच्या कामकाजाची पाहणी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज यांनी  शहरातील उंटवाडी परीसर,पेठ रोडचे रस्ते,साधुग्राम,गंगाघाट आदी भागाची पाहणी करून पालिका आयुकांशी चर्चा करुन कामाचा आढावा घेतला,या वेळी मनसेच्या अंतर्गत गटबाजीमुळे मनसेच्या काही नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या दाैराकड़े पाठ फिरवल्याचे दिसून आले. यावेळी राज ठाकरे यांनी टोलबंदीबद्दल नाराजी व्यक्त केलीये. टोल माफ़ीबद्दल मी पूर्ण समाधानी नसून,100 कोटींच्या खालची टोल बंद करावे तसंच अन्य टोल वरील वसुली करताना पारदर्शकता असावी अशी मागणी राज यांनी केली. राज्यातील टोलनाक्यांवर मशीन मेड टोल वसुली व्हावी असंही राज ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे, मनसेनं टोलवसुलीविरोधात आंदोलनं केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2015 09:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close