S M L

कृपाशंकर सिंहाकडे दोन पॅन कार्ड

6 नोव्हेंबर मंुबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याकडे दोन पॅन कार्ड आहेत. कृपाशंकर यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन वेगळेवेगळे पॅन कार्ड नोंदवले आहेत. पॅन कार्ड अर्थातच परमनेंट अकाउंट नंबर हा भारतीय नागरिकांच्या आयुष्यभराच्या आर्थिक नोंदीसाठी महत्वाचा आहे. सर्व भारतीयांना एकच पॅन कार्ड नंबर मिळत असताना कृपाशंकर सिंग यांच्या साठी मात्र नियम वेगळे आहेत. त्याच्या कडे दोन पॅन नंबर आहेत. 2004 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सिंग यांनी AVAPS 1485L हा पॅन नंबर सादर केला होता. तर 2009 च्या निवडणुकीच्या वेळी कृपाशंकर सिंग यांनी CFYPS 989P हा पॅन कार्ड नंबर सांदर केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या सोबत मैत्रीपुर्ण संबध असणार्‍या कृराशंकर सिंग ऐन मंत्रिंमंडळ निर्माण होण्याच्या वेळेत दोन पॅनकार्ड नंबर मुळे अडचणीत आले आहे. आयकर खात्याच्या वेबसाईट नुसार पॅन मध्ये सादर करण्यात आलेले नाव कधीही बदलले जाऊ शकत नाही. जर आयकर कार्यालयाकडे रितसर अर्ज करुन पत्ता बदलवता येतो. मात्र पॅन नंबर तोच राहतो. पण कृपाशंकर सिंग यांच्या बद्दल हे नियम लागू पडतात की नाही हाच खरा प्रश्न आहे. कृपाशंकर सिंग यांच्या यांची आम्ही या संदर्भात प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॅमेरावर सांगण्यास नकार दिला. मात्र, मी 2004 मधील पॅनकार्ड रद्द केलं आहे. माझे वकील विजय सिंग हे प्रकरण हाताळत आहेत. माझी मंंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे हे कटकारस्थान केलं जात असल्याच आरोप कृपाशंकर सिंह यांनी केला आहे. मनसेनही कृपाशंकर सिंग यांच्या दोन पॅन कार्डच्या प्रकरणावरुन विरोध करायला सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2009 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2009 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close