S M L

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यात जहाजावरची आग आटोक्यात

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 01:54 PM IST

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यात जहाजावरची आग आटोक्यात

ongc fire01 जून : मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापासून 200 किमी अंतरावर आग लागलेल्या ओएनजीसीच्या जहाजाचं रेस्क्यु ऑपरेशन अजुनही सुरू आहे. रविवारी संध्याकाळी ओएनजीसीच्या एका जहाजाच्या इंजिनरुममध्ये आग लागली होती. त्यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर आणि दोन जहाजांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

जहाजावरील असलेल्या 33 कर्मचार्‍यांपैकी 28 जणांना सुखरुप दुसर्‍या जहाजावर हलवण्यात आलं तर पाच कर्मचारी जहाजाची देखरेखेसाठी अजुनही जहाजावर आहेत. ओएनजीसीच्या दुसर्‍या जहाजाच्या मदतीनं हे जहाज मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर आणलं जातंय.

आज रात्रीपर्यंत हे दोन्ही जहाजं मुंबईत पोहचतील. जहाजाची कंपार्टमेंटस अजुनही बंद आहेत. त्यामुळे आग नक्की कुठे लागली आणि का लागली याचं कारण समजू शकलेलं नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close