S M L

नाशिकमध्ये गुंडाराज ; भरदिवसा तरूणाची हत्या, व्यापार्‍यावर प्राणघात हल्ला

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 07:35 PM IST

नाशिकमध्ये गुंडाराज ; भरदिवसा तरूणाची हत्या, व्यापार्‍यावर प्राणघात हल्ला

nashik crime301 जून : नाशिक आता गुन्हयांचं शहर म्हणून ओळखलं जातंय की काय ?, असं म्हणावं लागेल. कारण तोडफोड, खून, हाणामारी,चोरी या गुन्ह्याचं प्रमाण इथं वाढत चाललंय.

शहरातल्या एन. डी. पटेल रोडवर किरकोळ वादातून शैलेश सासे या तरुणाचा खून करण्यात आलाय. यानंतर फरार आरोपींना पकडण्याची मागणी करत मृताच्या संतप्त नातेवाईकांसह काही तरुणांनी थेट जिल्हा हॉस्पिटलचीच तोडफोड केली.

तर दुसरीकडे पंडित कॉलनी परिसरात वाईन शॉपचे मालक मदन कुमार हे दुकान बंद करून घरी जात असतांना पाळतीवर असलेल्या 6 जणांनी तलवारीने वार करत त्यांच्याकडचे 17 लाख रुपये लुटले. यात मदन कुमार आणि त्यांचा ड्रायव्हर गंभीर जखमी झालेत.

याबाबत सरकारवाडा पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आलीये. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांचं वाढत प्रमाण चिंतेचा विषय बनलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close