S M L

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आघाडीने का नाही पाठवला? -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 07:49 PM IST

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आघाडीने का नाही पाठवला? -मुख्यमंत्री

01 जून : धनगर आरक्षणावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या गौप्यस्फोटानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकावर निशाणा साधलाय. आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाचा प्रस्ताव का नाही पाठवला असा सवालच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. धनगर आरक्षणाचा मराठा आरक्षणासारखा फियास्को होऊ देणार नाही. आम्ही योग्य अभ्यास करून प्रस्ताव पाठवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

धनगर जातीला आरक्षण देता येणार नाही, असं पत्रं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लिहिलंय असा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे भाजपने विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षण देण्याचं आश्वासनं दिलं होतं. पण, पंतप्रधानांनीच नकार दिल्यामुळे भाजपची गोची झालीये. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारकडे बोट दाखवले.

'राज्यात आमचं सरकार 31 ऑक्टोबरला आलं आणि शरद पवारांनी धनगर आरक्षणाचं पत्र केंद्राला त्यानंतर पाठवलं. हाच प्रस्ताव राज्यात आघाडीचं सरकार असताना का पाठवला नाही?' असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. कालपासून विरोधक फक्त टीका करत आहेत. एवढ्या वर्षात हा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही याची खंत त्यांच्यात दिसत नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षणाचं फक्त राजकारण सुरू आहे. धनगर आरक्षणाचा मराठा आरक्षणासारखा फियास्को होऊ देणार नाही. आम्ही योग्य अभ्यास करून प्रस्ताव पाठवू असं आश्वासन त्यांनी दिलं.

सुप्रिया सुळेंचा खुलासा

विशेष म्हणजे, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं घुमजाव केलंय, असं दिसतंय. याचं कारण म्हणजे धनगर जातीला आरक्षण देता येणार नाही, असं पत्रं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लिहिलंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ऑक्टोबर 2014मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हा धनगरांना आरक्षण देऊ, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. पण आता आपल्या शब्दावर भाजप मागे जाताना दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close