S M L

योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांची रविवारची सुट्टी रद्द ?

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 08:16 PM IST

योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांची रविवारची सुट्टी रद्द ?

01 जून : गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेल्या योग साधना आता 21 जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होणार आहे. यादिवशी शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पण, 21 जून हा रविवार येतोय. तरीही योगदिन साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना रविवारीही शाळेत यावं, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. पण, रविवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणं, योग्य नाही, अशी टीका विरोधक करत आहेत.

संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस सआंतरराष्ट्रीय योग दिनन म्हणून घोषित केलाय. संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यासह 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून आता साजरा होणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा व्हावा अशी मागणी केली होती.

एवढंच नाहीतर 21 जून या तारखेला हा दिवस साजरा व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. अखेर संयुक्त राष्ट्राने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून योग दिन म्हणून जाहीर केला.

पहिला योग दिन साजरा करण्यासाठी मोदी सरकारने जोरदार तयारी सुरू केलीये. बाल दिनाच्या दिवशी मोदींनी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संवाद साधला होता. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शाळांमध्ये योग साधनेचे धडे देण्यात येणार आहे. पण, नेमका रविवार आल्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांनी हजर राहवे असा आदेश जारी केलाय. रविवारची सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांना बोलवू नये असा सूर विरोधकांनी लगावलाय. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांत यावरून 'वादाचा योग' रंगण्याची चिन्ह आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 08:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close