S M L

आधीच बंद केलेल्या टोलचा यादीत समावेश -मलिक

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2015 09:38 PM IST

navab_malik01 जून : राज्यात सरकारनं टोलमुक्ती तर केलीये. या टोलमुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारवर आरोपस्त्र सोडले आहे. आघाडी सरकारने आधीच बंद असलेल्या टोलनाक्याची अंशत: टोलमुक्ती दिलेल्या टोलनाक्यांच्या यादीत समावेश केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

मनमाड तालुक्यातल्या पानवडी टोलनाका आधीच आघाडी सरकारने बंद केला होता. मात्र, पानवडी टोल नाक्याचा अंशत: टोलमुक्ती असलेल्या 53 टोल नाक्यांच्या यादीत नव्याने समावेश करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.

हा टोल बंद असताना सेनेचे स्थानिक शिवसैनिक बेकायदेशीरपणे टोल गोळा करत होते. आता इथे जड वाहनांकडून टोल वसुलीची मुभा शिवसैनिकांना देण्यात आलीय, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2015 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close