S M L

चुरशीच्या वनडेत भारताचा 3 रन्सने पराभव

6 नोव्हेंबर हैदराबादमध्ये रंगलेल्या पाचव्या वन डेत चुरशीच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा फक्त 3 रन्सनी पराभव केला. शॉन मार्श आणि शेन वॉटसनच्या धुवांधार बॅटिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 351 रन्सचं टार्गेट टेवलं होतं. पण अगदी अटीतटीच्या झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या मॅचमध्ये भारताचा पराभव जरी झाला असला तरी सचिन तेंडुलकरच्या झंझावातानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मॅचमध्ये सचिननं इतिहास घडवला. त्याने वन डे करिअरमधील 17000 रन्सचा टप्पा तर पार केला. पण त्याचबरोबर वन डे मधील आपली 45 वी सेंच्युरी ठोकली. अशी कामगिरी करणारा सचिन हा क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू ठरलाय. इतकचं नाही तर सचिनने जोरदार बॅटिंग करत 141 बॉल्समध्ये तब्बल 19 फोर आणि 4 सिक्स ठोकत 175 रन्स केले. भारताने ही मॅच जरी गमावली असली तरी सचिनला साथ दिली ती सुरेश रैनानं. रैनानं 59 बॉल्समध्ये 3 फोर आणि 3 सिक्स ठोकत 59 रन्स केले. 175 रन्सची तुफानी इनिंग खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मॅन ऑफ द मॅच ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2009 09:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2009 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close