S M L

मोनिकाच्या मारेकर्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2015 08:34 PM IST

मोनिकाच्या मारेकर्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

monica more302 जून : नागपूरमध्ये 2011 च्या मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणी चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये. कुणाल जयस्वाल, श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे, प्रदीप सहारे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

मुख्य आरोपी कुणाल जयस्वाल याला पाच लाख रुपये दंड तर इतर तीन जणांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय. नागपूर सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. सरकारी पक्षाची आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी कोर्टाने नाकारलीये. याप्रकरणी 31 साक्षीदार तपासण्यात आलेत. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली.

नागपूरच्या नंदनवन परिसरात केडीके इंजिनिअरींग कॉलेजची विद्यार्थीनी मोनिका किरणापुरे हिची 11 मार्च 2011 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणातला मुख्य सुत्रधार कुणाल जयस्वाल आपला मित्र प्रदीप सहारे याच्या मदतीनं केडीके कॉलेजमध्ये शिकणार्‍या आपल्या प्रेयसीच्या खुनाचा कट रचला होता. आणि भाडोत्री गुंड श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे यांना सुपारी दिली होती. आरोपींनी मोनिकाला कुणालची प्रेयसी समजून धारदार आणि तीक्ष्ण शस्त्रानी भोसकून तिची हत्या केली होती.

याप्रकरणी कुणाल जयस्वाल, प्रदीप सहारे, श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे, रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे यांच्यावर खटला सुरू आहे. आज नागपूर सत्र न्यायालयाने सहा आरोपींपैकी चौघांना दोषी ठरवलंय. तर दोघांची निर्दोष मुक्तता केलीये. दुपारच्या सत्रात कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. तासभरानंतर कोर्टाने आपला निर्णय देत चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close