S M L

रवी शास्त्री टीम इंडियाचे अंतरिम कोच

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2015 04:30 PM IST

रवी शास्त्री टीम इंडियाचे अंतरिम कोच

02 जून : गेल्या कित्येक दिवसांपासून रिक्त असलेलं भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी माजी क्रिकेट रवी शास्त्री यांची निवड करण्यात आलीये. बांग्लादेश दौर्‍यासाठी रवी शास्त्री यांची भारतीय टीमच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड झालीये. जोपर्यंत मुख्य आणि पूर्णवेळ प्रशिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शास्त्री प्रशिक्षक राहणार असल्याचं समजतंय.

पूर्ण वेळ कोचसाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांची समिती विचार करणार आहे. त्यांचा अहवाल ते बीसीसीआयला पाठवतील.आणि मग कोच निवडण्यात यईल. त्यांच्याबरोबर संजय बांगर यांना बॅटिंग कोचपदी कायम केलंय. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत डंकन फ्लेचर यांनी कोच म्हणून टीम इंडियाचं नेतृत्व केलं. त्यानंतर त्यांचा करार संपल्यानं, बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. यासाठी सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांनी नावं चर्चेत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close