S M L

यंदा पाऊस कमीच !, हवामान खात्याचा अंदाज

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2015 09:37 PM IST

d32no_rain_02 जून : एकीकडे मान्सूनची चातकासारखी वाट पाहिली जात आहे पण, यंदाच्या वर्षी कमी पावसासाठी तयार रहा असा इशारा हवामान खात्याने दिलाय. या वर्षी फक्त 88 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. या आधी यावर्षीच्या पावसाचं प्रमाण 93 टक्के असेल असं भाकित हवामान खात्याने केलं होतं. अगोदरच अवकाळी, गारपिटीने बळीराजा हवालदील झालाय त्यातच कमीपावसामुळे बळीराजाचा जीव आता टांगणीला लागलाय.

कमी पावसामुळे देशाच्या वायव्य भागाला याचा सगळ्यात जास्त फटका बसेल असं सांगण्यात येतंय. देशभरात सध्या उष्णतेची तीव्र लाट असताना ही बातमी निश्चितच चांगली नाही. यासंदर्भात काय पावलं उचलायची हे ठरवायला आज केंद्र सरकारच्या पातळीवर बैठक होणार आहे. या प्रश्नाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केलीये, असं भूविज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

रघुराम रामन यांनीही व्यक्त केली मान्सूनबद्दल चिंता

आज क्रेडिट पॉलिसी जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम रामन यांनी मान्सूनबद्दल चिंता व्यक्त केली होती. सरासरीच्या 88 टक्के एवढाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे, 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणार असेल तर दुष्काळाची भीती असते. याचाच अर्थ अन्नधान्याच्या उत्पादनात येत्या वर्षात घट होणार ही चिंता स्टॉक मार्केटमध्ये पसरली. बँक, ऑटो आणि रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

'कोकणात मान्सून 17 जूननंतर'

हवामान खात्याने मान्सून 5 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं असलं तरी कोकण किनारपट्टीवर मान्सून 17 जून नंतरच दाखल होईल असा अंदाज मच्छिमारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे मासेमारी बंदीचा सरकारी कालावधी सुरू होऊनही कोकणातल्या बहुतांश मच्छीमारांनी पुढचे दहा दिवस मासेमारी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2015 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close