S M L

'नेस्ले'नं मॅगीची खात्री दिली म्हणून जाहिरात केली, माधुरीचा खुलासा

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2015 04:31 PM IST

'नेस्ले'नं मॅगीची खात्री दिली म्हणून जाहिरात केली, माधुरीचा खुलासा

03 जून : चटकद मॅगीच्या जाहिरातीमुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षितने अखेर यावर प्रतिक्रिया दिलीये. नेस्ले इंडियानं मॅगी सुरक्षित असल्याचं आश्वासन दिल्यावरच मी त्याची जाहिरात केली, असा खुलासा अभिनेत्री माधुरी दीक्षितनं केलाय. माधुरीने ट्विट करून मॅगीबद्दल खुलासा केलाय.

माधुरी म्हणते, मी हल्लीच नेस्लेच्या टीमची भेट घेतली. आम्ही दर्जा आणि सुरक्षेच्या कडक चाचण्या करतो आणि गिर्‍हाईक आमची पहिली प्राथमिकता आहे, असं ते मला म्हणाले. म्हणून मी जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. तसंच आपण गेल्या कित्येक वर्षांपासून मॅगी खातो अशी कबुलीही माधुरी दिली. मॅगीबद्दल जे सुरू आहे त्याबद्दलही माधुरीने चिंता व्यक्त केली.

माधुरीने मॅगीच्या जाहिरातीत मॅगी खाल्यामुळे तीन पोळ्यांइतकं फायबर मिळतं आणि तुम्ही फिट राहता, असा संदेश तिनं या जाहिरातीतून दिलाय. या जाहिरातीमुळेच हरिद्वार अन्न आणि औषध विभागानं माधुरीला नोटीस बजावलीये आणि आता तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2015 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close