S M L

नाशिकमध्ये ५ रेशनमाफियांवर मोक्का

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2015 10:22 PM IST

नाशिकमध्ये ५ रेशनमाफियांवर मोक्का

nashik reshan03 जून : नाशिक जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार करणार्‍या पाच वाहतुकदारांना थेट मोक्का लावण्यात आलाय. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. या धडक कारवाईमुळं राज्यातील रेशन माफियांवर चाप बसण्याची शक्यता आहे.

सरकारी गोदामातून, तालुका पातळीवर पोहोचलेले रेशनच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणातून गळती होत असल्याचं लक्षात आलं होतं.

पोलिसांनी या प्रकाराचा तपास केल्यावर धान्य चोरीला गेल्याचा बनाव करत माफियांनी ते थेट काळाबाजारात विकल्याचा स्पष्ट झालं होतं.

संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार आणि रमेश पाटणकर असं या वाहतूकदारांची नाव असून, वाडी वर्‍हे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2015 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close