S M L

लोढा बिल्डर्सला 'ईडी'ने बजावली नोटीस

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2015 09:58 PM IST

लोढा बिल्डर्सला 'ईडी'ने बजावली नोटीस

lodha03 जून : मुंबईतील प्रसिद्ध लोढा बिल्डर्सच्या आर्थिक व्यवहारांच्या चाैकशीसाठी अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने  नोटीस बजावलीये. ईडीने लोढा डेव्हलपर्सला परदेशातल्या संबंधित कंपन्यांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

गेल्या 19 मे रोजी लोढा डेव्हलपर्सला ईडीने फेमा कायद्याच्या कलम 37 नुसार नोटीस बजावली होती. ईडीचे मुंबईतले सहाय्यक संचालक आशुतोष कुमार यांच्या आदेशाने ही नोटीस बजावण्यात आलीये.

नोटीशीत एका आठवड्याच्या आत सर्व कागदपत्रे आणि माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लोढा डेव्हलपर्सची आणि संबंधित कंपन्याच्या परदेशातली स्थावर व जंगम मालमत्ता आणि परदेशी गुंतवणुकीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2015 09:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close