S M L

वर्ध्यात चार लाखांचा दारूसाठा जप्त

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2015 10:21 PM IST

वर्ध्यात चार लाखांचा दारूसाठा जप्त

wardha403 जून : वर्धा जिल्ह्यात एकीकडे दारूबंदी आहे पण दुसरीकडे हातभट्टीचे गोरखधंदे सुरू आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या पारधी बेड्यावर पोलिसांनी ऑपरेशन वनीश राबवून चार लाखांचा दारूसाठा जप्त केलात. यात सेवाग्राम पोलीस आणि मुख्यालयाचे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बारा आरोपीना अटक केली आहेत.

वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा आहे. परंतु याच जिल्ह्यात जमिनीत सड़व्यासोबत गाडून ठेवलेले ड्रम जेसीबीच्या सहय्याने बाहेर काढण्या इतपत दारु विक्री होते. बेडयावरील पारधी दारुचा सडवा आठवडाभर ड्रममध्ये भरून जमिनीत गाडून ठेवतात. त्यानंतर दारू तयार करुन विकली जाते. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल रुजू झाल्यानंतर आतापर्यंत केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2015 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close