S M L

बदलापूर आश्रम तोडफोड प्रकरण : आशिष दामले 36 तासांनंतरही फरार

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2015 12:43 PM IST

बदलापूर आश्रम तोडफोड प्रकरण : आशिष दामले 36 तासांनंतरही फरार

ashish damale04 जून : बदलापूरमध्ये गुंडगिरी करणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले 36 तासांनंतरही फरार आहे. आशिष दामलेला शोधण्यासाठी पोलिसांची 4 पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने कारवाई करत आशिष दामलेची हकालपट्टी केलीये.

मंगळवारी रात्री आशिष दामले आणि त्याच्या समर्थकांनी बदलापूर येथील ईनगावमध्ये नरेश रत्नाकर यांच्या आश्रमाची तोडफोड केली होती. या प्रकरणी आशिष दामलेविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आश्रमाच्या तोडफोडीनंतर दामले फरार झालाय.

आज आशिष दामले याचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलिसांनी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जवाब नोंदवलाय. अंगरक्षकांनी आशिष दामले याला रोखलं आणि जबरदस्ती गाडीत बसवलं असा जवाब दिलाय. आश्रमात तोडफोड झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. दामले यानं आपण कुठे जात आहोत याची पूर्व कल्पना पोलीस अंगरक्षकांना दिली नाही असा बचावही पोलिसांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close