S M L

बदलापूर आश्रम तोडफोडप्रकरणी दोन पोलिसांचं निलंबन, दामले अद्याप फरार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2015 09:26 PM IST

बदलापूर आश्रम तोडफोडप्रकरणी दोन पोलिसांचं निलंबन, दामले अद्याप फरार

04 जून : गुंडगिरी करणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले अजूनही फरार आहे.  आशिष दामले आणि त्याच्या समर्थकांनी काल (बुधवारी) बदलापूर इथल्या आश्रमाची तोडफोड केली होती.

आशिष दामलेला शोधण्यासाठी पोलिसांची 4 विशेष पथकं रवाना झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने कारवाई करत आशिष दामलेची पक्षातून हकालपट्टी केली. आशिष दामले याचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलिसांनी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे.

अंगरक्षकांनी आशिष दामले याला रोखलं आणि जबरदस्ती गाडीत बसवलं असा जबाब दिला आहे. आश्रमात तोडफोड झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दामले याने आपण कुठे जात आहोत याची पूर्वकल्पना पोलीस अंगरक्षकांना दिली नाही असा बचावही पोलिसांनी केला. तर आशिष दामलेला अटक करण्यासाठी आश्रमाचे नरेश रत्नाकर यांनी उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे तर या घटनेचा बदलापूरकरांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे.

दरम्यान, आशिष दामलेचा सहकारी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीये. चौकशीसाठी आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तर दामले याचे अंगरक्षक गायकवाड़ आणि शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 09:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close