S M L

बारची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2015 10:28 PM IST

बारची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

04 जून : बियर बारची तोडफोड केल्यामुळे कल्याणमध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीये.

काल रात्री 12.30 च्या सुमारास प्रकाश भोईर यांच्यासह काही साथीदारांनी शैलजा बारची तोडफोड केली. यामध्ये मनसेचे विद्यमान नगरसेवक उल्हास भोईर, तर मनसेचे कार्यकर्ते सचिन शिंदे ,अभिजीत बोरकर आणि बंड्या देशमुख यांचा समावेश आहे. बार मालकाच्या तक्रारीवरून त्यांच्यावर बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 08:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close