S M L

राज्यात 'योग दिना'वरून रंगला राजकीय आखाडा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2015 09:58 PM IST

राज्यात 'योग दिना'वरून रंगला राजकीय आखाडा

04 जून : येत्या 21 जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पण, या योगदिनावरून आता राजकीय हटयोग सुरू झाला आहे. योग दिन साजरा करण्याच्या फडणवीस सरकारच्या सक्तीवर एमआयएमने आक्षेप नोंदवला आहे.

योगातल्या काही आसनांना इस्लाममध्ये मंजुरी नाही, असं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं. तसंच राज्य सरकार योग दिवस लोकांवर थोपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यापूर्वी काँग्रेसनेही योगदिनाच्या सक्तीवर आक्षेप नोंदवला होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांना शाळेत बोलावणं चुकीचं आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

दरम्यान, याप्रकरणी वाढता विरोध बघता भाजपनेही एक पाऊल मागे घेतलं आहे. योगादिनाची कुणावरही सक्ती नाही आणि कुणावरही कारवाई होणार नाही, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच एमआयएमने प्रत्येक गोष्टीत धर्म आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, एमआयएमच्या विरोधानंतर आता सरकारने योग दिन ऐच्छिक असेल, अशी नमती भूमिका घेतली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close