S M L

एमसीए निवडणुकीत शिवसेनाXभाजप?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2015 02:57 PM IST

एमसीए निवडणुकीत शिवसेनाXभाजप?

04 जून : एमसीए निवडणुकीत राजकारणाचा आखाडा होण्याची शक्यता. बाळ महादळकर पॅनलच्या विरोधात शिवसेना रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमसीए निवडणुकीत क्रिकेट फर्स्ट पॅनलकडून राहुल शेवाळे आणि प्रताप सरनाईक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बाळ महाडदळकर पॅनलकडून आशिष शेलार उपाध्यक्षपदासाठी रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला मिळू शकतो.

17 जूनला एमसीएची निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवारांनाही शिवसेना आव्हान देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2015 10:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close