S M L

काॅल ड्राॅपला वैतागलात ?, कमेंट करा

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2015 04:28 PM IST

काॅल ड्राॅपला वैतागलात ?, कमेंट करा

09  जून : हॅलो...हॅलो...हं बोला...हॅलो...आणि फोन कट...! हे तुमच्या-आमच्यासोबत नेहमी होतं...कधी बॉसशी बोलत असाल, तर कधी आपल्या प्रियजनांशी... नेमकं फोनवर बोलणं सुरू असतं आणि फोनमध्येच कट होतो... मग सॉरी चुकून फोन कट झाला असं उत्तर देण्याची बारी आपल्यावर येते...पण का असं उत्तर द्यायचं?, का सॉरी म्हणायचं...? फोन कंपन्यांच्या 'कॉल ड्रॉप'बाजीमुळे तुम्हाला हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. नुसता नाहक त्रास नाही तर तुमच्या पैशांवर डल्लाही मारला जातोय... म्हणूनच या कंपन्यांच्या 'कॉल ड्रॉप'बाजीला आवर घालण्यासाठी आयबीएन नेटवर्कनं छेडली आहे खास मोहीम #NoCallDrops... तुम्ही कॉल ड्रॉपला वैतागला असाल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा... तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा...सेकंद सेकंदाचे पैसेखाऊ कंपन्यांना काही सूचना द्यायच्या असतील त्याही तुम्ही नोंदवू शकता...

का होतो कॉल ड्रॉप ? ,काॅल ड्राॅप म्हणजे काय?

तुम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीचं नेटवर्क वापरत असाल. प्रत्येक टेलिकॉम कंपनीकडून तुम्हाला आकर्षक असा कॉलरेट प्लॅन दिला जातो. उदाहरणार्थ,

तुम्हाला 1 रु. प्रतिमिनिट कॉल रेट आहे. तुम्ही जेव्हा फोनवर बोलता तेव्हा 30 किंवा 40व्या सेकंदाला फोन कट होतो (म्हणजे कॉल ड्रॉप होतो). यामुळे होतं असं की, तुम्ही देता एक रुपया पण बोलता फक्त 40 सेकंद...त्यानंतर पुन्हा कॉल करता आणि पुन्हा 1 रुपया कंपनीला देता. म्हणजे तुमचं बोलणं जर एक मिनिटभराचं असेल तर तुम्हाला 2 रुपये मोजावे लागतात. बरं हेच नाही...हाच कॉल ड्रॉप 1 मिनिट 10 सेकंद किंवा 5 सेकंद असाही कट होतो. त्यामुळे तुम्हाला एका कॉलचे मोजावे लागता 2 रुपये...अशा प्रकारे टेलिकॉम कंपन्या तुम्हाला त्रास तर देतातच आणि तुमची जाहीरपणे लूटही करतात. तुमच्या मेहनतीचे पैसे तुमच्या डोळ्यादेखत कंपन्या कॉल ड्रॉपच्या नावाखाली सहज लुटतात.

त्यामुळेच आम्ही सुरू केलीय खास मोहीम #NoCallDrops... तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता... फेसबुक, ट्विटरवर कमेंट करताना वापरा हॅशटॅग #NoCallDrops

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close