S M L

गोदावरी महास्वच्छता अभियान

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2015 01:45 PM IST

गोदावरी महास्वच्छता अभियान

05 जून : पर्यावरण दिनानिमित्त आज दहा हजार नाशिककरांनी मिळून गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. तसंच दहा हजार झाडे सुध्दा लावण्याचा संकल्प सोडला आहे.

गोदावरी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण अभियानाला एका वनमहोत्सवाचे स्वरुप देण्यात आले आहे. या महोत्सवात शहरातील खासगी शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालये, कामगार, शेतकरी, छोटे विक्रेते इत्यादींचा सहभाग आहे. गोदावरी महास्वछता अभियानाला आज सकाळपासूनच सुरूवात  झाली आहे. गोदावरीसह इतर सहा नद्यांची नागरिकांनी स्वच्छता केली. यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून नागरिकांनी घाटांचीही स्वच्छता केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close