S M L

आता बोला.., या गावात बंधारेच गेले चोरीला !

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2015 06:37 PM IST

आता बोला.., या गावात बंधारेच गेले चोरीला !

स्वप्नील घाग, गुहागर- रत्नागिरी

05 जून : रुपेरी पडद्यावरती सरकारी विहिरी चोरी झाल्याचे प्रसंग दाखवून सरकारी कामकाजाच वास्तव दाखवलं जातंय. हेच वास्तव कोकणातील गुहागर तालुक्यात दिसतंय. पाणलोट योजनेमधील एक नव्हे चक्क सहा बंधारे त्रिशूळ साखरीमध्ये चोरीला गेले आहेत. इथं मात्र सरकारी निधीतून बांधलेले पाणलोटचे बांधलेले दगडी बंधारे चोरले जातात.

पाणी अडवा पाणी जीरावाचा नारा केंद्र सरकारने कृषी विभागामार्फत ग्रामीण भागापर्यंत दिला यातूनच कृषी विभागाच्या पाणलोट विभागातून प्रत्येक गावांना कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून काही रोजगार हमी योजनेचीही कामे होऊ लागली. विविध ठिकाणी पाणी अडवण्यासाठी दगडांचे कच्चे बंधारे उभारण्यात आले. सध्या त्रिशूळ साखारीत पाणलोट विभागाचा पक्क्या स्वरुपाचा मोठा बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी गावात बांधलेल्या सहा दगडी बंधारे चोरून नेले आहेत. यामुळे याठीकणाचा बंधारा निधी फुकट गेला आहे.

त्रिशूळ साखरी हा गाव डोंगराळ भागात वसले आहे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे या गावातील सर्व वाड्यांना सरकारी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. भूगर्भातील पाण्याच्या नियोजनासाठी या गावात कृषीविभागाच्या पाणी संवर्धनाच्या योजना राबवल्या गेल्या. कच्च्या बंधार्‍याच्या माध्यमातून पाणी जमिनीत जिरले जात होते. सध्या हे बंधारेच नसल्यामुळे त्रिशूळ साखरीतला पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

नवीन बंधार्‍याच्या बांधकामासाठी जुन्या बंधार्‍यांचे दगड चोरून शासनाच्या निधीचा गैरवापर संगनमताने होत असल्याचा आरोप होत आहे .यामुळे नवीन बंधार्‍याच्या बांधकाचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close