S M L

न्यूयॉर्कमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2015 11:30 PM IST

न्यूयॉर्कमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी

usa rajabhishek05 जून : सातासमुद्रापार मोठ्या थाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. यंदा प्रथमचं न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्केवअवर शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीये.

टाईम्स स्केवअवर जगप्रसिद्ध चौकात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष ऐकायला मिळणार आहे. छत्रपती फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलाय.

भारतीय संस्कृतीचा झेंडा जगभर पोहोचवणं हा या फाऊंडेशन स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. जगभरात या संस्थेच्या शाखा पसरल्या असून युरोप, रशिया, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलियातही हा समारंभ साजरा झालाय. संस्थेच्या वतीनं या पूर्वीही शिवजंयती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राणी अहिल्यादेवी होळकरांचा जन्मदिन साजरा केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 10:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close