S M L

महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2015 11:32 PM IST

maggi ban in army405 जून : वादाच्या भोवर्‍या सापडलेल्या मॅगीवर आता महाराष्ट्रातही बंदी घालण्यात आलीये. महाराष्ट्रामध्येही मॅगी चाचणीत नापास झालीये. मॅगीच्या प्रत्येक नमुन्यात शिसाचं प्रमाण वेगवेगळं आढळलंय. त्यामुळे मॅगीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केली. या घोषणेमुळे नेस्ले कंपनी आता बाजारातून पॅकेट परत मागवणार आहे. राज्य सरकारचा पुढचा निर्णय येईपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, सांगलीमध्ये मॅगीचे 15 सॅम्पल घेण्यात आले होते. 15 सॅम्पलची चाचणी घेतली असता सर्व सॅम्पलमध्ये वेगवेवगळे प्रमाण आढळून आले. या अगोदर दिल्ली, केरळ, हरियणामध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. मॅगीमध्ये शिसं आणि MSGचं प्रमाण जास्त आढळून आल्यामुळे ही बंदी घालण्यात आलीये. तसंच लष्कर आणि बिग बाजाराने मॅगीला बाहेरचा रस्ता दाखवलाय.

'बंदीसाठी विधेयक आणणार'

दरम्यान, मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांच्या व्यतिरिक्त इतर उत्पादनं विकू न देण्याचा सरकारचा मानस आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये एखादी गोष्ट मिळतेय, म्हणजे ती प्रकृतीला चांगलीच असणार, किंवा त्यात औषधी गूण असणार, असा काही लोकांचा समज असतो. म्हणून याबद्दल नवा कायदा आणण्याचा आम्ही विचार करतोय, असं केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं. त्यामुळे नेस्ले असो अथवा जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या उत्पादनावरही बंदी येऊ शकते असे संके त अहिर यांनी दिलं.

'मॅगी सुरक्षितच'

मात्र, नेस्लेने मॅगी सुरक्षित असल्याचा दावा केलाय. नवी दिल्लीमध्ये नेस्लेचे ग्लोबल सीईओ पॉल बल्क यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि मॅगी खाणं सुरक्षित आहे असं वारंवार सांगितलं. मॅगीमध्ये असलेलं ग्लुटामिक ऍसिड हे नैसर्गिकरीत्या असतं आणि त्यात जास्त MSG मिसळलं जात नाही, असं बल्क यांनी म्हटलंय. कंपनीने मॅगी नूडल्स बाजारातून परत मागवण्यात आले असले तरी ही कारवाई तात्पुरती आहे. मॅगी पुन्हा लवकरच बाजारात उपलब्ध होईल असं पॉल बल्क यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 11:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close