S M L

मध्य रेल्वेची रात्रीची वाहतूक वेळेप्रमाणे !

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 09:31 PM IST

mumbai-locals06 जून : आज मध्य रेल्वेवर डीसीचं-एसीमध्ये परिवर्तनाचं काम लांबणीवर टाकण्यात आलंय. त्यामुळे मुंबईकरांनी मेगाब्लॉक मधून सुटका झालीये. आज रात्री नेहमीच्या वेळेप्रमाणेच लोकल सेवा सुरू राहतील.

मध्य रेल्वेवर सीएसटी ते ठाणेदरम्यान शनिवारी रात्री बारा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत डीसीचं एसीमध्ये परिवर्तनाचं काम केलं जाणार होतं. त्यामुळे या काळात या मार्गावर विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे 2,500 व्होल्ट्स डीसीचा प्रवाह 25 हजार व्होल्ट्स एसी होणार आहे. त्यासाठी शनिवारी रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी शेवटची लोकल सीएसटीहून सुटणार होती. पण, प्रवाशांना होणार्‍या त्रासमुळे हा चाचणी पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close