S M L

पानसरेंच्या संशयित मारेकर्‍यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 01:39 PM IST

पानसरेंच्या संशयित मारेकर्‍यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

06 जून : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. कॉ. पानसरेंच्या संशयित मारेकर्‍यांचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आलंय. 2 संशयितांची प्रत्येकी 4 रेखाचित्रं प्रसिद्ध करण्यात आलीये. एसआयटीनं कोल्हापूरमध्ये आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेतली. एसआयटीच्या तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी ही माहिती दिली.

तपासात प्रगती आहे, पण कोणताही ठाम निष्कर्ष नाही, असंही संजयकुमार यांनी स्पष्ट केलंय. पानसरेंवर गोळीबार झाला त्यादिवशी मारेकरी घटनास्थळी दोन होते आणि त्यांनी 2 बंदुकांचा वापर केला असंही संजयकुमार यांनी सांगितलंय. मारेकर्‍यांना पकडण्यासाठी गोवा,कर्नाटक पोलिसांची पण मदत घेतली जातेय. आम्ही आरोपींना लवकरात लवकर पकडू असा विश्वासही संजयकुमार यांनी व्यक्त केला.16 फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे पत्नीसह मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर गोळीबार झाला होता. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोल्हापूर आणि मुंबईत उपचार झाला. मात्र, 20 फेब्रुवारीला उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांपासून मारेकरी अजूनही मोकाटच आहे.

 एसआयटी काय म्हणते?

- मारेकरी घटनास्थळी 2 तास फिरत होते

- हत्येसाठी दोन बंदुकांचा वापर

- दोन मारेकर्‍यांचे प्रत्येकी 4 रेखाचित्रं प्रसिद्ध

- ठाम निष्कर्ष नाही पण तपासात प्रगती आहे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close