S M L

दुष्काळामुळे महानोरांनी जोहन्सबर्ग संमेलनवारी केली रद्द

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 08:01 PM IST

na dho mhanoar306 जून : नियोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी परदेशवारी करण्यास ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी नकार दिलाय.

मराठवाड्यात दुष्काळानं शेतकरी होरपळताना मी हार तुरे घेणं संवेदनशिल मनाला पटत नाही असंही महानोर म्हणाले.

'राना शेतातल्या' माझ्या कवितांवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. त्याच राना शेतात भीषण परिस्थिती आहे.

त्यामुळे जोहान्सबर्ग इथं नियोजित साहित्य संमेलनाला जाणार नसल्याचं पत्र ना.धो.यांनी साहित्य मंडळाला पाठवलंय. जोहन्सबर्ग इथल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ना.धो महानोरांना देवू करण्यात आलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 08:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close