S M L

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, चांदिवलीत इमारतीच्या आगीत 7 ठार

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 09:55 PM IST

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, चांदिवलीत इमारतीच्या आगीत 7 ठार

06 जून :मुंबईत पुन्हा एकदा अग्नितांडव बघायला मिळालं. चांदिवलीतल्या लेक होम नावाच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झालाय. तर 22 जण जखमी झालेत. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. आगीचं नक्की कारण समजू शकलेलं नाही. पण, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होतेय.

लेक होम इमारतीला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमाराला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागली. आगीत एक फ्लॅट जळून खाक झाला तर इतर दोन फ्लॅटमध्येही मोठं नुकसान झालं. फ्लॅटमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढलं. पण, जी माणसं आगीपासून वाचण्यासाठी लिफ्टमध्ये गेली त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीला ऐरोलीतल्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांना जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. आग आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close