S M L

गोविंदराव आदिक यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2015 02:01 PM IST

गोविंदराव आदिक यांचं निधन

07 जून :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गोविंदराव आदिक यांचे रविवारी निधन झाले. ते 76 वर्षाचे होते.

आदिक हे फुफ्फुसाच्या जंतू संसर्गाने आजारी होते. त्यांना आठ दिवसापूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती खालावली. ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. मध्यरात्री 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पार्थिवावर श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर इथल्या पब्लिक स्कूलच्या आवारात आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close