S M L

मोदींच्या हस्ते ढाकेश्वरी देवीची पूजा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2015 12:33 PM IST

मोदींच्या हस्ते ढाकेश्वरी देवीची पूजा

07  जून : बांगलादेश दौर्‍याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी ढाकेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली. ढाकेश्वरी मंदिरात पुजा केल्यानंतर मोदींनी ढाक्यातील रामकृष्ण मिशनलाही भेट दिली.

800 वर्षांचा इतिहास असणार्‍या ढाकेश्वरी देवीच्या मंदीरात जाऊन मोदी यांनी पूजा केली. त्यांनी प्रार्थना सभेतही भाग घेतला. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. मोदी यांच्या दौऱयानिमित्त मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

शनिवारी भारत-बांगलादेश दरम्यान गेली 41 वर्षे सुरू असलेला जमीन सीमा वाद अखेर ऐतिहासिक करारानंतर संपुष्टात आला. या करारामुळे दोन्ही देश काही भूभाग एकमेकांना हस्तांतरित केला. त्याबाबतच्या कराराची कागदपत्रे दोन्ही देशांनी एकमेकांना दिली. या करारास संसदेने गेल्याच महिन्यात मंजुरी दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. बांगलादेशला 2 अब्ज डॉलरचं कर्जही भारतातर्फे मंजूर करण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close