S M L

मुंबईत गुरूद्वारावर भिंद्रनवालेचं पोस्टर !

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2015 06:23 PM IST

मुंबईत गुरूद्वारावर भिंद्रनवालेचं पोस्टर !

07  जून : स्वतंत्र खलिस्तान चळवळीचा म्होरक्या जरनेलसिंग भिंद्रनवाले याचं एक पोस्टर मुंबईतल्या विक्रोळी भागात लावण्यात आलं आहे. विक्रोळीमध्ये नव्या गुरूद्वाराचं बांधकाम सुरू आहे. तिथे हे पोस्टर लावण्यात आलं आहे.

सध्या जम्मूमध्ये भिंद्रनवालेच्या पोस्टरवरून तणाव निर्माण झाला असताना समाजातलं वातावरण बिघडवण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत. भिंद्रनवालेला नोव्हेंबर 1984मध्ये सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये ठार करण्यात आलं होतं. स्वतंत्र खलिस्तान चळवळ मोठी करण्यात भिंद्रनवालेचा मोठा हात होता.

या पार्श्वभूमीवर, ज्यांनी देश तोडण्याची भाषा वापरली, अशा देशद्रोहींना प्रतिष्ठा मिळता कामा नये, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. खलिस्तानवादी चळवळीला नेस्तनाबूत करण्यासाठी देशाने पंतप्रधानांना, लष्करप्रमुखांना आणि असंख्य निरपराध नागरिकांना गमावून मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयानं आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन ज्यांनी हे पोस्टर लावलय, त्यांच्याविरोधात देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजेत, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close