S M L

चांदिवली आगीतून इतरांना वाचवताना 'त्यांनी' गमावले प्राण!

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2015 06:32 PM IST

 चांदिवली आगीतून इतरांना वाचवताना 'त्यांनी' गमावले प्राण!

07  जून : मुंबईत चांदिवली भागात काल (शनिवारी) लागलेल्या आगीत इतरांचे जीव वाचवताना दोघांचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे.

चांदिवली येथील लेक व्ह्यू सोसायटीला लागलेल्या आगीत 28 वर्षांचा तौसीफ शेख हा तरुण इतरांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:च मृत्यूमुखी पडला. आग लागल्याचं समजताच जवळच्याच चाळीत राहणारा तौसिफमदतीसाठी धावला. त्याने बिल्डिंगमधून काहींना सुखरूप बाहेरलसुद्धा काढलं. पण आणखी लोकांना वाचवत असताना लिफ्टमध्ये अडकल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. तौसिफला तीन मुलं आहेत.

त्याच्या बरोबर याच बिल्डिंगचा वॉचमन हीरालाल गुप्ता हासुद्धा रहिवाशांना वाचवताना लिफ्टमध्ये अडकून मृत्युमुखी पडला. हीरालाल याला चार मुलं आहेत. आग लागल्यानंतर बिल्डिंगची लिफ्ट तळ मजल्यावर आल्यानंतर बंद करायला हवी होती. पण लिफ्ट वरच्या मजल्यावर असताना ती बंद केल्याने खबरदारी न घेतल्यामुळेच या दुर्घटनेतली मृतांची संख्या वाढली,असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close