S M L

भारत-बांगलादेश केवळ शेजारी नसून साथीदार देश- नरेंद्र मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2015 09:16 PM IST

भारत-बांगलादेश केवळ शेजारी नसून साथीदार देश- नरेंद्र मोदी

07  जून :  भारत आणि बांगलादेशात झालेला जमीन हस्तांतरणाचा करार बांगलादेश दौर्‍याचे फलीत असून दोन्ही देश केवळ पास-पास नसून आता साथ-साथ ही असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढाक्यामध्ये केलं आहे. बंगबंधू इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी मोदींनी कितीही बलवान देश असला तरी यापुढे एकमेकांच्या मदतीशिवाय जग चालणार नसल्याचंही म्हटलं आहे. तसंच दोन्ही देश मिळून वीजेच्या समस्येवर तोडगा काढणार असल्याचंही मोदींनी सांगितलं. विकासाच्या मुद्द्यावर भारत नेहमी बांगलादेशच्या पाठीशी उभा राहिल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

बांगलादेशातील सर्व महत्त्वाच्या पदांवर महिला नेतृत्त्व करत असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगत देशातील महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितलं. त्याच बरोबर भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या 22 करारामुळे जगातील विकासाचा पाया मजबूत होईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला.

मोदींनी यावेळी दहशतवादाच्या समस्येवरही भाष्य केलं. दहशतवादाच्या मुद्यावर स्वत:ला झीरो टॉलरेंस देश घोषित करण्याचा संकल्प करणार्‍या बांगलादेशचे कौतुक करायला हवं. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून या विरोधात सर्व देशांनी एकत्र लढलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close