S M L

पालघरमध्ये रिक्षाला अपघात; गरोदर महिलेसह 3 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2015 01:13 PM IST

पालघरमध्ये रिक्षाला अपघात; गरोदर महिलेसह 3 ठार

08  जून : मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ गुंदावे इथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला असून, यातील एक महिला गर्भवती होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई-सफाले रोडवर गुंदावे गावाजवळ रस्त्याच्या वळणाला थांबलेल्या रेतीच्या ट्रकला या रिक्षाने मागून धडक दिली. यात त्या रिक्षाचा चक्काचूर झाला. या रिक्षातून एका गर्भवती महिलेला रूग्णालयात नेत होते. पण, या दुदैवी अपघातामध्ये त्या गर्भवती महिलेसह अन्य तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2015 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close