S M L

राज्यात दहावीचा विक्रमी निकाल, 'कोकण'ने मारली बाजी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2015 04:42 PM IST

राज्यात दहावीचा विक्रमी निकाल, 'कोकण'ने मारली बाजी

08  जून : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील 91.46 टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींची संख्या मोठी आहे. राज्यात 92.94 टक्के मुली आणि 90.18 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

नऊ विभागांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल यंदा 96. 54 टक्के लागलाय. मात्र लातूर विभाग यंदा निकालात मागे पडला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती, नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ भागातून 14 लाख 37 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हानिहान पाहायचं झालं तर सिंधुदुर्गचा निकाल अव्वल आहे तर नांदेडचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपला निकाल मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्यांना या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण - 96.54 टक्के
  • कोल्हापूर - 95.12 टक्के
  • पुणे - 95.10 टक्के
  • मुंबई - 92.90 टक्के
  • नाशिक - 92.13 टक्के
  • औरंगाबाद - 90.57 टक्के
  • अमरावती - 86.84 टक्के
  • नागपूर - 87.01 टक्के
  • लातूर - 86.38 टक्के

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2015 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close