S M L

भुजबळ गोत्यात, 5 अधिकार्‍यांसह FIR दाखल

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2015 10:57 PM IST

Chagan Bhujbal08 जून : मुंबईतील सांताक्रुझ कलिना परिसरातली मुंबई विद्यापिठाचा भुखंड परस्पर एका नामांकीत खाजगी कंपनीला भाड्याने दिल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम छगन भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाच अधिकार्‍यांवर अँण्टी करप्शन ब्युरोने आज एफआयआर दाखल केला.

या वादग्रस्त भुखंडावर मुंबई विद्यापिठाचं ग्रंथालय उभारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर जिल्हाधिकार्‍यानी सोपवली होती. पण, सार्वजनिक बांधकाम विभागाने एक रुपया प्रति चौरस फूट इतक्या नाममात्र दराने मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भुखंड 99 वर्षांच्या भाडे पटट्यावर इंडिया बुल्स कंपनीला दिला त्याबदल्यात छगन भुजबळ ट्रस्टच्या खात्यावर इंडिया बुल्स कंपनीने अडीच कोटी जमा केले. चौकशीनंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसच हरीश पाटील, अनिक कुमार गायकवाड या अधिकार्‍यांवर फसवणूक आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनिलकुमार गायकवाड हे लातुरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांचे मोठे बंधू आहेत. अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन पाठोपाठ हा एक मोठा धक्का मानला जातोय.

कोणत्या अधिकार्‍यांविरोधात एफआयआर दाखल झाला ?

1) गजानन सावंत, तत्कालीन उपअभियंता

2) हरिष पाटील , तत्कालीन कार्यकारी अभियंता

3)अनिलकुमार गायकवाड, तत्कालीन अधिक्षक अभियंता

4) संजय सोळंकी, तत्कालीन अवर सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई

5) एम एच शहा, तत्कालीन सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2015 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close