S M L

एमसीएच्या आखाड्यात शरद पवारांविरोधात सेना मैदानात ?

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2015 07:49 PM IST

pawar_mca09 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राजकीय आखाडा बनतोय. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना एमसीए निवडणुकीत शिवसेना आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

क्रिकेट फर्स्ट गटाकडून विजय पाटील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. त्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. एमसीए निवडणूकीसाठी आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याशिवाय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे, सुभाष देसाई हे देखिल एमसीए निवडणुकीच्या रिंगणात असतील.

तर बाळ म्हादळकर गटाकडून भाजपचे आशिष शेलार उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, या अगोदरही शरद पवारांनी एमसीएचे अध्यक्षपद भुषवले आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीत उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण, शरद पवारांनी मध्यंतरी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पण, आता सर्वच राजकीय पक्ष आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे.

अशी होते एमसीए निवडणूक

- एमसीएमच्या अंतर्गत एकूण 367 क्लब्स

38 असोसिएट्स क्लब्सना मतदानाचा अधिकार नाही

367 पैकी 329 क्लब्सना मतदानाचा अधिकार

329 क्लब्सपैकी 211 हे मैदानी क्लब्स

81 ऑफिस क्लब्स, 37 कॉलेज आणि शालेय क्लब्स

एकूण 329 क्लब्स एमसीएची कार्यकारिणी निवडतात

एमसीएची कार्यकारिणी 17 सदस्यांची

1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 2 सचिव, 1 खजिनदार

11 व्यवस्थापकीय समितीचे सदस्य

17 पैकी प्रत्येक सदस्याला 329 क्लब्सकडून प्रत्येकी एक प्रतिनिधी मतदान करतो

बहुमत मिळणारा उमेदवार विजयी ठरतो

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close